याड असूदे झाड असूदे जपू तयाला
ताड असूदे माड असूदे जपू तयाला
पोर असूदे अथवा प्राणी घे सांभाळुन
गोड असूदे जाड असूदे जपू तयाला
मोहर येता आम्रतरुवर राखणीस जा
कैरी अथवा पाड असूदे जपू तयाला
वेल वाहते भार फुलांचा खोड तिचे मग
नाजुक अथवा जाड असूदे जपू तयाला
जल भरलेली निळ्यासावळ्या आठवणींची
मोळी अथवा बाड असूदे जपू तयाला
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)