रत्नांच्या खजिन्यामधले मी रत्न अलौकिक बाई
मम पुत्ररत्न झळझळते खणखणते पौरुष आई
ही कन्या सात्विक माझी जणु माधुर्याची पुतळी
बघ सान असोनी बनली वाटण्यास सौरभ ताई
त्या आखिव गावामध्ये मूढांना पाणी पाजे
तो भाऊ माझा तगडा आहेच अतिवीर भाई
तोलण्या गुणांना दैवी ती सत्त्वपरीक्षा देते
तेलात उकळत्या पडते ही इवली नाजुक राई
पाण्यात पाहुनी मजला ते … पाय लावुनी पळती
ते पोचतील जेथेही मी दिसेन ठाई ठाई
पानांची रिमझिम शिशिरी फुलबाग मनाची फुलते
जाळीत उन्हाच्या खुलते तनु सुगंध भरली जाई
मी धनू शिवाचे पेले क्षत्राणी शूर ‘सुनेत्रा’
सत्यात बिंब बघण्या जगताची झाले माई
समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा