आज तू बोलना रे मना
मौन तू त्यागना रे मना
सावल्या सोडुनी चालल्या
भटकणे सोडना रे मना
पांगली माणसे जवळची
ती पुन्हा जोडना रे मना
गोडवा चाखण्या प्रीतिचा
विकृती जाळना रे मना
रडविले तू मला कैकदा
मजसवे हासना रे मना
मैत्र हे अंतरी टिकविण्या
मोकळे होचना रे मना
गा पुन्हा गीत तू ते जुने
भिजवुनी भावना रे मना
वृत्त – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा (वीरलक्ष्मी)