रोज लोटस व्हॉटसपवरी दिसतात रोज रोज
रोज टपोर गुलाबकळ्या फुलतात रोज रोज
झेंडू जाई लिली चमेली सोनटक्क्याचं कुसुम
रोज साजरा करायला “डे” खुडतात रोज रोज
केवडा बकुळ गुलबक्षी अन भुईचंपक डेझी
रोज काव्यात डोकावतात खुलतात रोज रोज
बोगनवेली रंगबिरंगी कुंपणावरच्या पऱ्या
रोज माझिया रोजनिशीवर उडतात रोज रोज
अक्षरगाडीतुन फिरताना गझलफुलांचे मळे
रोज जादुई छडी फिरविता डुलतात रोज रोज
गझल मात्रावृत्त (मात्रा २७)