वनभृंग – VAN BHRUNG


घनदाट कुंतलावरी कृष्ण तव लिहिल्या श्यामल गझला मीही
वनभृंग जणू तव नयनांवर दो लिहिल्या निर्जल गझला मीही

भिजवून भावना दवबिंदूंनी पिंपळ पानावरती सुकल्या
मम् जुनी लेखणी झरझर फिरवुन लिहिल्या मंगल गझला मीही

मनमोर नाचता मेघांच्या छायेत फुलवुनी पूर्ण पिसारा
आसूड मेघनेमधून ओढत लिहिल्या चंचल गझला मीही

भरभरुन ओंजळी उधळत मोती जलद गर्जता आभाळातुन
तापून कावल्या मातीवरती लिहिल्या प्रांजल गझला मीही

नवनवोन्मेषशालिनी सुंदरा प्रतिभा मम हृदयात बहरता
विसरून घुंगरू मौनामध्ये लिहिल्या निर्मल गझला मीही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.