वळण जरी नसे तरी हट्टाने वळणारच
वळण्यातिल घेत मजा मजला मी छळणारच
पोहचून आधी मी वाट तुझी बघणारच
वाटेवर अडुन तुझ्या पुन्हा मधे बसणारच
नीर भरत डबा भरत भाव सहज भरणारच
मोजत ना मात्रा मी गुणगुणुनी लिहिणारच
कला मला अवगत रे जगण्याची वळण्याची
नियतीवर विसंबणे मजला ना रुचणारच
काय कुठे बिघडलेय सारे जग मस्त मस्त
मस्तीतिल गझलेची वळणे मज कळणारच
कोण भरीचाय इथे कशास मी बघू बरे
नशेत रंगल्यावरी भलेबुरे गळणारच
हुंदडती धडपडती गुरगुरती शेर जरी
सवडीने शेरांवर कर माझे फिरणारच