पहाट झाली जागी झाले ऊठ वाघळे मला म्हणाली
अंधारातच पिंपळ सळसळ करतो आहे मला म्हणाली
झिपरी पोरे मजेत गाती वेचत कचरा रस्त्यावरती
गुणगुण गाता गाता गाणी असे गायचे मला म्हणाली
बूच फुलांचा सडा मनोहर वेचायाला फुले जायचे
स्वप्न किती दिवसांनी अजुनी पुरे व्हायचे मला म्हणाली
फिरावयाला निघे पाखरू घरट्यामधुनी माय पाहते
चिमण पाखरे किलबिल करती मीही गाते मला म्हणाली
अक्षर मोती पेरत पेरत चल चल संगे नाचत बरसत
तुझ्यासारखे असे सुनेत्रा लिहित रहावे मला म्हणाली