वाटण घाटण मजेत करतो पाटा वरवंटा
सहज फिरे पाट्यावर सर सर माझा वरवंटा
पुरण वाटतो कधी खोबरे कधी कधी चटणी
हरेक कामामधे साथ दे आता वरवंटा
पुरणयंत्र अन मिक्सर सुद्धा हेच काम करती
त्यांच्यासम बघ कुशल कितीहा जाडा वरवंटा
नका धुण्याला बडवू मजवर म्हणे तुम्हा पाटा
बिजली जेव्हा गायब होते काढा वरवंटा
हरेक यंत्रासंगे दोस्ती माझी सदा सदा
जुनी संस्कृती म्हणे जपूया खासा वरवंटा
गझल – मात्रावृत्त (१६+१०=२६ मात्रा)