वाह व्वा – VAAH VVA


वाह व्वा
वाह.. व्वा …
या मुलींना सा.. र… काही
कळत कळत …नकळत जुळत जातं …
नकळत जुळत जुळत मळत पण जातं …
म्हणून सांगते मुलींनो …आणि मुलग्यांनो ,
फार मळू … देऊ नका…
वळायचं तेवढं वळून घ्या…
कारण नंतर किती रडा …किती जोडा …
उपयोग नाही होणार…
ज्याच्या त्याच्या कर्मांचा हिशेब…
चुकता मात्र करावाच लागणार…
जोपर्यंत वळत असतं …
तोपर्यंत लिहीत रहा … वळून वळून पहात रहा …
उगाच ओढून ताणून काही ,,,
काही आनंद देत नसतं ….
जास्त कळलं तरी ते …
हवं तिथंच ….
दाखवायचं असतं ….
कुठे पण दाखवायचं नसतं …
अचूक वेळी ते आपोआप …
झळकत असतं …
ऐन्यात …ज्ञानात …आणि…
चारित्र्यात !…
म्हणूनच म्हणते …
या टाळ्या ऐकून भुलू नका …
आतले आवाज ऐकायला शिका ! ! …..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.