मोर नाचतो नाच नाचतो भूमीवरती
राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती
राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे
सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती
…
वक्रपणा मम विळीसमान
वेलांटीच्या कळीसमान
सुमान माझा शब्द भरीचा
कुसुमांकित दळ खळीसमान
…
फक्त वासना फुलवित जाते जिथे फुलोरा
हवा कशाला असा दिखाऊ प्रथे फुलोरा
मूर्त असावी घरी अंतरी वा गाभारी
अहंपणाचा नको त्यावरी कथे फुलोरा
…