काळजाला थोपटावे अंथरावे वाटले तर …विसर सारे ….
वापरोनी ते धुवावे वाळवावे वाटले तर …विसर सारे….
काष्ठ पत्ती वाळवीली चूल दगडी पेटवीली …भर दुपारी….
त्या चुलीवर काळजाला पेटवावे वाटले तर …विसर सारे ….
सांगते ती सावजाला मी जपावे काळजाला …अंथरोनी….
मीच चालुन त्यावरी ते चुरगळावे वाटले तर …विसर सारे ….
हाक ती मारीत आहे चालली वारीत आहे …भास होतो ….
हाक ऐकायास कोणा थांबवावे वाटले तर …विसर सारे….
मी जरी रे ओढणी रंगीत आहे … मलमली संगीत आहे….
तुज पहाटे ओढुनी मज जोजवावे वाटले तर… विसर सारे ….
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा ३५)
लगावली – गालगागा/ ५ वेळा
मुस्तजाद गझल