काही स्फुट अर्धस्फुट रचना
१) व्योम
व्योम निळे मेघ धवल पहाड शुभ्र चुंबितो
पायऱ्या चढून जाय जीव धन्य धन्य तो
प्रकृतीत संस्कृति संस्कृतीत प्रकृती
जपून ठेव ठेवण्यास निसर्ग राब राबतो
…
२)सांजा
कातरलेल्या सांजा
तिन्ही त्रिकाळी वांदा
झाल्लर म्हणुनी झग्यास लावा
सजवून अपुल्या वाटा
…
३)फायदा
स्वच्छ राहता वाटा
प्रवास सुखकर होई
नाद करूनी थुंकायाचा
काही नाही फायदा
…
४)गांजा
ऐन्यापुढल्या सांजा
शिणगाराचा मांजा
गालावरच्या बटांस सखये
धूळ चारतो गांजा
…