वृत्त अपुले मंजुघोषा आज आहे
वीस आणिक एक मात्रा साज आहे
मी लिहावे तू लिहावे मस्त काही
जाण मित्रा खास माझा बाज आहे
बासरीचा सूर कृष्णा हा नसावा
राधिकेच्या अंतरीची गाज आहे
पाहिले स्वप्नात रात्री स्वप्न वेडे
उंच माझ्या मस्तकी सरताज आहे
कुंतलातिल शुभ्र गजरा मोगऱ्याचा
मैफिलीच्या पापण्यांतिल लाज आहे
राम नाही श्याम नाही धुंद कान्हा
गुपित सांगे तेच माझे राज आहे
सांगते आता सुनेत्रा ऊठ राजा
शह कशाला नाव मम शहनाज आहे
वृत्त – मंजुघोषा , मात्रा २१
लगावली – गा ल गा गा / गा ल गा गा / गा ल गा गा