चल खावया पाणीपुरी
भरल्यात साऱ्या घागरी
मम शारदा विद्या सई
रेखाटते मज हासरी
निल सुषम शैला पद्मजा
हाती तिच्या फुल टोकरी
उन्मेष झाला मेष अन
नव कल्पना झाली परी
मनमोहिनी मंदाकिनी
घुमवीत आहे बासुरी
हा कांचनी मृदु शिंपला
भिजला दवाने अंतरी
आली फळे वाटावया
सुंदर सुनेत्रा नाचरी
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/