खळाळणारा बघत रसमयी धवल सांडवा भाळू कशाला
तरल धुक्याच्या मलमलीतून रंग पारवा माळू कशाला
परवडणारी चैन सुगंधी दरवळणारी फुले वेलीवर
शुभ्र कुंतली अत्तर दर्दी धूप ताटवा जाळू कशाला
जीव लावण्या जीवांवरती कुत्रे मांजर पक्षी पारवे
श्रावण बीवण अश्विन कार्तिक पर्व भादवा पाळू कशाला
पहाटवारा पहाट चुंबन टोक गाठता जाणिव नेणीव
तोच तोच तो गूळ फोडुनी अती गोडवा चाळू कशाला
वजने मापे न्याय करोनी अश्रुपिंड दो सुकून कोरडे
अश्रूंनी तोलण्या भावना सत्य ताजवा टाळू कशाला
मम यंत्री मन सहज बसविते र्हस्व दीर्घला पलटून बघते
सत्त्व लीलया गळी उतरता गात मारवा वाळू कशाला
हवा गुलाबी ऊब जांभळी मिळवाया शेकोटी तांबडी
अंध रुढींच्या आगीमध्ये निळा गारवा झाळू कशाला
रंगबिरंगी कागद शाई गझल काव्य घन रंगून जाई
संधी काली दुःख खोदुनी जून आसवा ढाळू कशाला
कांती काया उजळवण्यास्तव लेप लावण्या मुखकमलावरी
गुणानुरागी घाम गाळती चेहऱ्यास वाफाळू कशाला
आर्जव तप सक्तीची तुलना ब्रह्मचर्य तागडीत झळाळे
छिद्रान्वेषी धुरकट नजरा कोर चांदवा क्षाळू कशाला
निर्वाणीची नकोच भाषा जड दुःखाचे मूळ गाठूनी
मक्त्यामधले नाव सुनेत्रा देत लाडवा गाळू कशाला