शेतकरी मन प्रसन्न व्हाया लेझिम खेळावे शेरांनी
भूमी देते गुरांस चारा तिजला वंदावे शेरांनी
निर्भरतेने व्यक्त व्हावया काव्यफुलांचे मळे बहरण्या
मुळापासुनी बदल हवा तर स्वतःस घडवावे शेरांनी
चपखल बसण्या शब्द नेमके वृत्त असावे मम वृत्तासम
वृत्ती निर्मल मम म्हणण्या मग मुळी न लाजावे शेरांनी
गूढ कसे हे मज समजावे कळल्याविन मी कसे वळावे
पुरे जाहला लपंडाव हा राज्य स्वतः घ्यावे शेरांनी
राज्य स्वतःवर आल्यावरती कधी न सोडे डाव सुनेत्रा
खेळगड्याला पकडुन देते त्याला हसवावे शेरांनी
गझल मात्रावृत्त(मात्रा ३२)