प्रेम-लग्नात हुंडा-बिंडा, हे कसलं प्रेम
लग्नाआधी देह-संबंध, म्हण शेम शेम
उलटी टीप अन धावदोरा, इथे न चाले
पिको यंत्रास बाजुला ठेव, घाल बरं हेम
मराठी खरी दिलदार परी, इंग्रजी म्हणे
“आली आली” म्हणता म्हणता, करे “कम केम”
माय मऱ्हाटी बहिणाबाई, कानडीचीगं
कन्नड मराठी सीमेवरी, बोलुया सेम
गुजरांचा केम छे केम छे, सर्वांना कळे
आट खेळ गेम खेळूयात, धरु खरा नेम
मात्रावृत्त – १६+८=२४ मात्रा