नाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे
गाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे
आरशाने तुझ्या त्या मला रूप दिधले
भाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे
जाहल्या एवढया गोड जखमा सुगंधी
घाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे
संत होते तुझ्या अंतरी भेटलेले
साव का मी सुनेत्रा तुझे आठवावे
वेड होते मला जिंकण्याचे मलाही
डाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे
गझल – अक्षरगण वृत्त(मात्रा २२)
लगावली – गालगागा/लगागा/लगागा/लगागा/