किती किती मी आहे सुंदर
माझ्यासाठी गाते अंबर
माझा अभिनय माझी काया
हृदयी रुजवी सत प्रेमांकुर
जीवांच्या कल्याणासाठी
वेड्यासम हा माझा संगर
क्षमा करा मज प्रिय बंधूंनो
तुमच्यासाठी फोडिन कंकर
तुमची पूजा हृदयापासुन
नका ढळू चालीने मंथर
मुग्ध फुलांचे भाव निरागस
टिपते हे रुणझुणते झुंबर
काळिज माझे सदा दक्ष हे
जिनानुयांचे जपण्या अंतर
प्रेमच मम जादूची कांडी
कशास आता जंतर मंतर
तुझा ‘सुनेत्रा’ बाज पाहुनी
करे पलायन हिंसक व्यंतर
मात्रावृत्त – ८+८=१६ मात्रा