सत्वरी आगळे वृत्त दे भौ मला
स्त्रग्विणीचा घडा घाट साकारला
सांग घोळू किती यात वृत्ती पिशी
तोडुनी जोडुनी तोल सांभाळला
सावळी मूर्त मी लाजुनी जांभळी
रंगुनी रंगली देह झंकारला
गोष्ट माझी तुझी साद घाली जगा
नाद वेडा खुळा जीव नादावला
पंचप्राणातली प्रीत उधळेन मी
पंच भूतांसवे येच नाचायला
स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त)
लगावलीः गालगा गालगा गालगा गालगा
मात्राः २१२ २१२ २१२ २१२ = २०