अता पूर्ण माझे समाधान झाले
खुले शस्त्र माझे पुन्हा म्यान झाले
डुले तृप्त काया गव्हाची गव्हाळी
पहाटे दवाचे उषःपान झाले
इथे झुंजल्या वृक्ष वेली तरूही
किती कोवळे हे पुन्हा रान झाले
निळीभोर स्वप्ने उशाशी कळ्यांच्या
नभी चांदण्यांचे निशागान झाले
असे सत्य सुंदर वचन जाणते मी
स्मरोनी शिवाला खरे ध्यान झाले
वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा /ल गा गा/ ल गा गा /ल गा गा