चल घे अता सल्लेखना
अन आत्महत्या टाळना
फासे उगा फेकू नको
असते जुगारी वासना
आता पुरे हे पूजने
त्यांच्यात काही राम ना
खोट्याच त्यांच्या घोषणा
माझी खरी ही साधना
काहूर उठता अंतरी
मौनात केला सामना
जमलेच ना मज टाळणे
शिव सत्य सुंदर भावना
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/