In this ghazal, the feelings associated with the process of ghazal creation are portrayed by the poetess. The ghazals have risen from the depths of the heart. They have faced storms and reached the harbor safely.
किती फाडल्या किती जाळल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
मातीमध्ये जरी गाडल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
वृत्त छंद अन अर्थ भावही, हृदयामधले प्रेम जपुनही
शब्दांनाही दिल्या जागल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
तळ विहिरीचा गाठुन आल्या, निर्झर सरिता सागर झाल्या
येता भरती गाज गाजल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
वादळ वारे असतानाही, शीड सुकाणू नसतानाही
किनाऱ्यास त्या कशा लागल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
मीच छाटल्या मीच उपटल्या, पुन्हा पुन्हा पण उगवुन आल्या
फुला-फळांनी अता वाकल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
रम्य पहाटे धुक्यात लपल्या, तप्त दुपारी बरस बरसल्या
रंगविण्या मृदु सांजसावल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
कुणी म्हणाले स्वस्त जाहल्या, कुणाकुणाला सुस्त वाटल्या
सुनेत्रास पण मस्त वाटल्या, गझला माझ्या पुरून उरल्या
One response to “सांज सावल्या – SAANJ SAAVALYAA”
सुनेत्राच्या गझला ग्रेट !!