सांज सावल्या – SAANJ SAAVALYAA


In this ghazal, the feelings associated with the process of ghazal creation are portrayed by the poetess. The ghazals have risen from the depths of the heart. They have faced storms and reached the harbor safely.

 

आकसल्यावर पुन्हा पसरल्या गझला माझ्या पुरून उरल्या
क्षमाशील भूवरी पातल्या गझला माझ्या पुरून उरल्या

पूल बांधण्या उड्डाणास्तव तपे लागली शासनास जिन
जिनवाणीतुन मुक्त बरसल्या गझला माझ्या पुरून उरल्या

तळ विहिरीचा गाठुन आल्या निर्झर सरिता सागर झाल्या
येता भरती गाज गाजल्या गझला माझ्या पुरून उरल्या

वृत्त छंद अन अर्थ भावही हृदयामधले प्रेम जपुनही
शब्दांनाही दिल्या जागल्या गझला माझ्या पुरून उरल्या

कर्मांचा डोंगर फोडाया जेसीबीला धरून हाती
तत्त्वार्थाच्या सूत्री आल्या गझला माझ्या पुरून उरल्या

चिमटे काढा स्वतः स्वतःला वा लावा वस्त्रांस वाळण्या
ऐसा परखड बोध जाहल्या गझला माझ्या पुरून उरल्या

रम्य पहाटे धुक्यात लपल्या तप्त दुपारी गळल्या खिरल्या
रंगविण्या मृदु सांजसावल्या गझला माझ्या पुरून उरल्या

वादळ वारे असतानाही शीड सुकाणू नसतानाही
किनाऱ्यास त्या कश्या लागल्या गझला माझ्या पुरून उरल्या

कुणी म्हणाले स्वस्त जाहल्या मस्त कुणाला चुस्त वाटल्या
‘सुनेत्रा’स पण चुस्त वाटल्या गझला माझ्या पुरून उरल्या

Ghazal written by sunetra.

 

 

 

 

 

 


2 responses to “सांज सावल्या – SAANJ SAAVALYAA”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.