पाच बारालाच लिहिला सातबाराचा उतारा
माझिया हाती धरेचा सातबाराचा उतारा
मी जरी शाईत काळ्या बुडवुनी टाकास लिहिते
सप्तरंगी रंगला हा सातबाराचा उतारा
काल होते चार बारा आज आहे पाच बारा
बघ सहा बारा उद्याला सातबाराचा उतारा
पुण्य मातीचे फळोनी मोतियासम अक्षरांचा
मज मिळाला हा चिठोरा सातबाराचा उतारा
टोलवीले कैक वेळा आज पण ते शक्य नाही
दे लिहोनी सात वेळा सातबाराचा उतारा
गालगागा/ ४ वेळा