गोरी गोरी राधा गवळण
जळात जाळे सोडे फिरवुन
जाळे बुडता पाण्यामध्ये
मासे फिरती झुळकन सुळकन
लहरत विहरत जाळ्याभवती
कुणी अडकते तयात पटकन
मासोळी कुणी चंचल चपला
निसटे जाळ्यातुनही पटकन
जाळे फेकत काठावरती
हसते गोरीमोरी गवळण
भरले मडके घेउन येई
घरी आपुल्या ठुमकत गवळण
मडके ठेउन तुळशीपाशी
साळोत्याने झाडे अंगण
मात्रावृत्त(१२+४ =१६ मात्रा)