सुंदरा सोनुलीला हवा घाल तू
तीन पाती फिरूदे असा ताल तू
नाचते डोलते बाहुली गोडुली
घाल अंगावरी दोरवा शाल तू
पाहतो तो तुझ्या लोचनी रोखुनी
व्हायचे लीन अन लाजुनी लाल तू
कोण मोठे कसे जाहले जाणते
केवढा वाटला बावळा काल तू
हात हे टोचरे बोचरे कापरे
ओढिशी का उगा गोबरे गाल तू
चीज आहेच तो साजिरा गोजिरा
दे उधळुनी तुझा त्यावरी माल तू
ही ‘सुनेत्रा’ शहाणी कळूदे तुला
का अजूनी असा टीन तू बाल तू
लगावली – गालगा गालगा गालगा गालगा