नाम रेखिते श्यामल भाळी
टिळा लाविते गौर कपाळी
भालप्रदेशी चंद्रकोर अन
शुक्राची चांदणी सकाळी
झाड उभे हे ध्यानासाठी
मांजर म्हणते पुरे टवाळी
नदीतटावर उभी राधिका
शोधायाला घागर काळी
दिवा लाविता अंतर्यामी
म्हणे सुनेत्रा हीच दिवाळी
मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)