In this Ghazal the poetess asks the question, how does she sing a song in absence of her beloved person? Aksharganvrutta used in this Ghazal is,
LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA.
कशी काय बोलू मला बोलवेना
कसा भार साहू अता साहवेना
हृदय वाहते हे तुझ्या आठवांनी
मनाला तरीही झुला बांधवेना
असे वाटते सर्व सोडून यावे
कुठे यायचे पण मनाला कळेना
करू काय माझ्या-तुझ्या पाकळ्यांचे
किती हार गुंफू गळा घालवेना
खुशाली तुझी फक्त सांगेल कोणी
जळो तूप सारे दिवा मालवेना
सुनेत्रा सुनेत्रा अशी साद दे रे
तुझे नाव सुंदर खरे आठवेना
वृत्त- ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.