मधुर फळे अती कडू तुझ्यामुळेच जाहली
बिया जरी न जून त्या मुळे खिळेच जाहली
सुरुंग लावुनी भुईत ध्वस्त टेकडी दिसे
इमारती नव्या उभ्या तळी बिळेच जाहली
उन्हात वावरे फिरे थकून जाय रोज ती
वहायचे खळाळुनी तरी तळेच जाहली
नयन निळे नजर खुळी पडून पाकळ्यांवरी
फुलांवरील अष्टगंध अन टिळेच जाहली
सुमार भावसंपदा तरी म्हणे परीच मी
कुरूप अर्थ लावण्या करी पिळेच जाहली
लगावली – लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा/
मात्रा २४