बेधुंद होउनी तू हा माळ सोनचाफा
हृदयात तव मनीचा सांभाळ सोनचाफा
अलवार भावनांनी तलवार देह होता
प्रसवेल गीत रमणी ओढाळ सोनचाफा
आहेच सुंदरी मी वेडात बोलता मी
काढेल खोड पुन्हा नाठाळ सोनचाफा
काढू नकोस अर्का टिकवून ठेव रंगा
जाळीतुनी धुक्याच्या तू गाळ सोनचाफा
झोपून मस्त रात्री झाले पुन्हा तवाने
पडते मजेमजेने हे बाळ सोनचाफा
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.