वचनास मम जागावया
गाते शिरा तानोनिया
कोठून त्याही उगवल्या
फुकटातले लाटावया
माझीच ही आहे धरा
दासी न ही तुडवावया
घाटात कोणी टाकला
तो कांब मज पाडावया
चल संगती माझ्या अता
तो हात हाती घ्यावया
डोक्यावरी ना बैसले
बसले इथे रक्षावया
मैत्रीतला माझ्या दुवा
आहे सुनेत्रा सोनिया
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/