पानजाळीतून पाहे, चंद्र तो आहे खराकी, बिंब पाण्यातिल खरे
प्रश्न वेडे का पडावे, आजसुद्धा ते तसे तुज, शोध आता उत्तरे
वेड वेडे लागले होते कुणाचे, पाहुनी डोळ्यात माझ्या, सांग रे
मोकळे आभाळ होण्या, व्यक्त तू बरसून व्हावे, एवढे आहे पुरे
वेड लावे वीज चपला, वादळांशी झुंजताना, फिरुन वेडे व्हावया
ती विषारी वावटळ पण पांगल्यावर, वादळासह, शांत तू होणे बरे
स्तन्यदा पृथ्वीप्रमाणे, नीर मेघातुन फुसांडे, कातळावर कोसळे
धबधब्याला फेनधवला, संयमाचे दो किनारे, अंतरी गाण्या झरे
भावना शब्दातल्या अन, गोडवा हृदयातला या, चाखण्यासाठीच मी
फणस काटेरी वरोनी, सोलला ऐसा खुबीने, खावया तू ये गरे
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा ४०)
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा/