स्वभाव माझा तुला कळावा
विभाव विपरित मला कळावा
कुरूप म्हणजे धरा स्वरूपी
खराच सम्यक तिला कळावा
कमाल विकृति जळून जाण्या
निसर्ग प्रकृतितला कळावा
तनास जपण्या मना फुलविण्या
धरेतला धर फुला कळावा
जरी न अक्षर टपोर मोती
तयातला गुण जला कळावा
फिरून त्याला बघेन यास्तव
बराच की तो भला कळावा
जरी कमी तो असेल बोलत
विखार जिव्हेतला कळावा
वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६
लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा गा