किती मी किती मी सुखे गात आहे
दवाच्या तुषारे उभी न्हात आहे
हवे ते हवेसे मला नित्य लाभे
उणे ना कशाचेच स्वर्गात आहे
मला स्वर्ग दिसतो तुम्हा स्वर्ग दिसतो
तिथोनीच मोक्षास मी जात आहे
फुलाया ग जीवा असा गंध देते
जणू केवड्याची खरी पात आहे
तुझ्या कैक वचनात साऊल गाणी
जशी माय माझी पिता तात आहे
मरावे फिरावे तरी जागवावे
उराया तुझ्या नित्य स्वप्नात आहे
सुनेत्रास आता मिळावीच मुक्ती
तुम्हा सांगण्याला इथे वात आहे
अक्षरगणवृत्त – मात्रा २०
लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगागा/…