असे असावे धैर्य हृदयीचे पाण्याला जे बर्फ बनविते
असे असावे शौर्य नारीचे अर्धे जे जे पूर्ण बनविते
असे असावे विणूनी शिवणे पुण्याने जे अर्थ बनविते
असे असावे ऊन हळदीचे कर्माला जे जीर्ण बनविते
असे असावे पैंजण पदीचे रुणझुणते जे तर्क बनविते
असे असावे झिजणे चंदनी हितकर प्रिय जे अर्क बनविते
असे असावे वादळ आत्मीक स्वभावास जे धर्म बनविते
असे असावे रदीफ काफिया शेरांचे जे मर्म बनविते
असे असावे दृष्टीतील बळ देहाला जे स्वर्ण बनविते
असे असावे शिशीरातील तप बाभळीस जे गर्द बनविते
गझल मात्रावृत्त – मात्रा ३३