टाळ्या पिटू कवींची चोहीकडे सराई
जो तो म्हणे स्वतःशी आहेच मी सवाई
टाळ्या असोत अथवा तो गजर वाहवाचा
करतोच जो इथेरे त्याची टळे पिटाई
शंका नको पुसू तू अन जाबही कुणाला
गिळण्यात मूग बसूनी आहे तुझी भलाई
प्रश्नांस फोड वाचा अन मिळव उत्तरांना
ना फोडशील वाचा करणार ते धुलाई
तू फक्त मस्त म्हणरे मजला नकोत टाळ्या
किटलेत कान दोन्ही मम गझल बघ हवाई
गझल – मात्रा २४
लगावली – गागालगा/लगागा/ गागालगा/लगागा/