हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला – HAVE HAVESE JE JE VATE TE TE MAG FULA


In this Ghazal the poetess asks a flower or a kid to demand everything it wants. This Ghazal is written in 26 matras.

हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला ;
गोळा-बेरिज, हवी  कशाला, पूर्णच भाग फुला.

नकोच गुणणे, आणि मिळवणे, नको वजाबाकी;
भागुन भागुन, मिळेल उत्तर, बाकी त्याग फुला.

सखे सोबती, घरकुल  दे मज, हिंदोळा पण दे;
दिलेस अंगण, फुलावया जर, होइन बाग फुला.

निरांजनातिल, सांजवात तू, तेजोमय कलिका;
तण पापांचे, जाळाया पण, होशिल आग फुला.

वसुंधरेवर, निशिगंधाचा, परिमल होउनिया;
शीतल सुंदर, चंद्रावरचे, पळवू डाग फुला.

अनुरागाचे, शस्त्र लालिमा, कवितेच्या गाली;
रंग नेत्रि मम, भरून श्यामल, गाइन  राग फुला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.