हसूत पसरट अथवा तिरके
आम्ही स्वतःशी वा कोठेही
घेऊ काळजी स्वतः स्वतःची .. वा जगताची
कशास चिंता मग जगताची
सार मिळो वा सांबाराचे
मारू भुरके
हसूत पसरट अथवा तिरके
उपदेशाचे किती फवारे
तुमचे तुम्हा लखलाभ होऊदे
सतत हसावे अन हसवावे
कुणी न उरले आता परके
हसूत पसरट अथवा तिरके
एकांतीही हसून घ्यावे
पोट भरावे .. हसून हसवून
हृदय झुलावे नवगाण्यावर
खुद्कन खो खो हा हा हो हो
हसूत पसरट अथवा तिरके