का देता मज ठोक? – KAA DETA MAJ THOK?


का देता मज ठोक?
गुरुजी का देता मज चोप?

रोजच करते घोकंपट्टी
कधी न घेते सुट्टीबिट्टी
तरी न मिळतो नंबर पहिला
आई करते कोप
गुरुजी का देता मज चोप?

स्वत:च रचतो कविता सुंदर
शिकतो मीही  जादू मंतर
गंडेदोरे बुवाबाजीचा
करतो भांडाफोड
गुरुजी का देता मज चोप?

रागदारी मी स्वरात बांधिन
मधुर मधुर मी गाणी गाईन
अभ्यासाच्या वेळी काहो
येते मजला झोप?
गुरुजी का देता मज चोप?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.