खाणी – KHANI (MINES)


श्रावण महिना गर्द पिसारा आकाशी दाटल्या
श्रावणातल्या सारी सुंदरी अंग भिजविण्या आल्या
छम्मक छम्मक नाद अंतरी चाहूल सुख शांतीची
भरवत आहे घास सुखाचा अवघ्या ब्रह्मांडाला
रंगून तलवारी मल्हारी ऊन पितांबर ल्याले
देवनागरी लिपीत ब्राम्ही अक्षर झरझरले
म्यान कट्यारी अंगरख्यावर चित्रांकित झाल्या
नकळत सोन्याच्या मुद्रांनी खाणी खणखणल्या
तडाग कातळ तळी मासळी सळसळते लीलया
रोम रोम चिद्घन चपलेवर वलयांकीत काया


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.