मुक्तक ..गोळे
गोळे कसले हे तर डोळे आग ओकणाऱ्या तोफांचे
छायाचित्रांमधून वर्षें जणू बरसती घन ठिणग्यांचे
कानगोष्ट ती मम जीवाची विसरुन जाण्या मंत्र ‘सुनेत्रा’
एक घालते ऐकच पात्रा ताम्राषाढी नक्षत्रांचे
रुबाई ..उपादान
उपादान तर अंतर्यामी निमित्त काया कर्मांचे
बंधास्रव पण पापपुण्य घन भावभावना कर्मांचे
रुबाईत दो शेर स्वयंभू वेगवेगळे बीज जीव
अक्षरमोती पेर स्वयंभू वेगवेगळे बीज जीव