भाव झळके मंत्र म्हणता टिपुन घे कोणास सांगू
मंत्र टिपता कागदावर उचल दे कोणास सांगू
चोरुनी मंत्रास करती कैद जाती गोत्रवेड्या
मंत्र माझा फिरुन येता धुमस रे कोणास सांगू
अर्थ देई जीवनाला रंग स्वप्नांना नव्याने
एक काढा पंडिता मी बनविते कोणास सांगू
रडकथांचा पुसुन पाढा भूतकाळातिल व्यथांचा
इंद्रधनुषी रंग भर चित्रात मम कोणास सांगू
वेगळेपण नेमके नव झळकण्या शेरांमधूनी
चल सुनेत्रा आम न्यारी चाल दे कोणास सांगू