एक एक जपण्यास मणी मी जपले जिनदेवाचे नाम
गात गात लढण्यास रणी मी जपले जिनदेवाचे नाम
गात गात धरण्यास फणी मी जपले जिनदेवाचे नाम
गात गात फुलण्यास वनी मी जपले जिनदेवाचे नाम
हंस शुभ्र तरतात जलावर झुलते नावेमध्ये बाळ
गात गात तरण्यास धनी मी जपले जिनदेवाचे नाम
झोप लागली गात सुखाने स्वप्नी दिसले काळे साप
गात गात उठण्यास बनी मी जपले जिनदेवाचे नाम
उदक नीर जल शांत मनातिल हलता झुलता लहरी त्यात
गात गात उडण्यास घनी मी मी जपले जिनदेवाचे नाम
गझल मात्रावृत्त (मात्रा ३१)