सूर ताल अन लय असताना लय असताना
गाणे गावे भय नसताना लय असताना
अधरीच्या वा लिहिल्या गाण्या यंत्र पकडते
मंत्र भारली सय हसताना लय असताना
चारित्र्याची ऐशी तैशी म्हणे गारुडी
पुद्गल शब्दां मय डसताना लय असताना
निश्चय काही करू न शकला बघत राहिला
व्यवहाराचा नय फसताना लय असताना
जय जय जय वा जैकाराचा घोष दुमदुमे
तंत्रामध्ये वय बसताना लय असताना