गा उन्हाचे रंग उधळत मस्तपैकी
गा धरेला मस्त खुलवत मस्तपैकी
नित्य असतो पंचमी सण फाल्गुनी बघ
राग रुसवा सोड पळवत मस्तपैकी
लाल पिवळा जांभळा घन गगन चुंबे
नाच चपले धुंद चमकत मस्तपैकी
काय बरवे काय सुखवे ओळखूनी
बरस मेघा देह भिजवत मस्तपैकी
मोतियांसम शब्द बरसे गझल वेडी
गा ढगा रे ढोल बडवत मस्त पैकी
तू दिलेल्या मम रदीफा मीच भुलले
लिहित गेले चिंब रंगत मस्तपैकी
माळला मक्ता सुनेत्रा गुरुकृपेचा
कुंतली नक्षत्र मिरवत मस्तपैकी