चालतेस चंचले उन्हात गीत गात गात
पावसात वादळात उग्र शीत गात गात
सोड हात हो पुढे भरार उंच क्षितिज पार
झेप यान घेतसे तुझीच जीत गात गात
नाव चंचला जरी सदैव शांत चित्त शुद्ध
वाट चालते सदैव जोजवीत गात गात
वाटतात ही फुले सुगंध रंग या जगात
सांडतात बरसतात देत प्रीत गात गात
हृदय कमल तृप्त नीर त्यात वाहतो तरंग
सूर ताल लय धरून बासरीत गात गात
वृत्त – चंचला, मात्र २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/
One response to “चालतेस चंचले – CHAALATES CHANCHALE”
अतिशय सुक्ष्म निरीक्षण, प्रगल्भ विचार आणि ओघवती भाषाशैली याचा सुरेख संगम म्हणजे सुनेत्रा ताईचे लिखाण.
समाजातील चालीरीतींचा सुक्ष्म अभ्यासही लेखनात उमटतो.