धांगडधिंगा किती पावसा
सांग असाका अती पावसा
वेड तुला का असे लागले
फिरलीका तव मती पावसा
झाड वडाचे तुझ्या काननी
पाव म्हणे तुज सती पावसा
धार खरी कापण्या भिजवण्या
घे पवनासम गती पावसा
घनफळ बिनफळ तुझे मोजण्या
कुठली आणू चिती पावसा
धांगडधिंगा किती पावसा
सांग असाका अती पावसा
वेड तुला का असे लागले
फिरलीका तव मती पावसा
झाड वडाचे तुझ्या काननी
पाव म्हणे तुज सती पावसा
धार खरी कापण्या भिजवण्या
घे पवनासम गती पावसा
घनफळ बिनफळ तुझे मोजण्या
कुठली आणू चिती पावसा