गुमान ना मिजास तव बसून मौन सोसली
खरेपणास धार मम कटी कसून लावली
सुके हिशेब बेगडी मला कधी न भावले
खुळे हुमान गोठले नवीन वाट पावली
प्रसव कळा सुन्या मुक्या उठेल गाज अंतरी
झुकून बघ दिसेल मूळ शांत गार सावली
पुरे अता उधार मागणे फिरून जोगवा
फुले फुलून वाटिका भरून पूर्ण सांडली
कनक कळ्या दवारल्या हवा तरून तापली
गुणानुराग गोधुली भिजून सांज रंगली