डोळ्यांत आसवांची आली भरून घागर
अन पापण्यांत स्वप्ने बुडली झरून घागर
भरुनी पुन्हा पुन्हा ती करते रिती स्वतःला
झाल्यावरी रिकामी येते तरून घागर
पश्चिम झळाळणारी तांब्यापरी बघूनी
मज माय पाठवीते छोटी घरून घागर
मम घागरीत सागर आहे मधुर जलाचा
मी रम्य घाट चाले डोई धरून घागर
घन तापताप तपुनी देता विजेस टाळी
सांजेस मेघमाला ओते वरून घागर